नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक !

January 11, 2012 1:01 PM0 commentsViews: 2

11 जानेवारी

नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं ही खबरदारी घेण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली. तर झेडपी आणि महानगरपालिका निवडणुकांची एकत्र मतमोजणी तांत्रिक बाबींमुळे अशक्य असल्याचंही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सतत होत असलेल्या कारवायांमुळे हा निर्णय घेण्यात आला. याबाबात गृहखात्याने आयोगाला ही बाब निदर्शनास आणून दिली. ही बाब मान्य करत दोन टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे.

close