सार्वजनिक उद्योगातल्या कर्मचार्‍यांना वेतनवाढ

November 20, 2008 1:11 PM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबरमंदीच्या या दिवसांमध्ये अनेक खासगी कंपन्या कर्मचार्‍यांची कपात करतायत. पण याचवेळी सरकारच्या सार्वजनिक उद्योगांसाठी मात्र चांगली बातमी आलीय. केंद्र सरकारचा हिस्सा असणार्‍या सुमारे दोनशे सार्वजनिक उद्योगांमधल्या कर्मचार्‍यांसाठी वेतनवाढ करण्यासाठी कॅबिनेटनं मंजूरी दिलीय. अडीच लाख कर्मचार्‍यांना जानेवारी 2007 पासूनची वेतनवाढ दिली जाणार आहे. या नव्या वेतनवाढीनुसार केंद्र सरकारच्या सार्वजनिक उद्योगातील प्रमुख अधिकार्‍यांचे पगार आता पंचावन्न हजार ते एक लाख रुपयापर्यंत असतील. या नव्या स्केलप्रमाणे कामाच्या तुलनेत मिळणारे इन्सेन्टिव्हज आणि शेअर्सही दिले जातील. या नव्या वेतनवाढीनंतर सरकारी सार्वजनिक उद्योगातून खाजगी क्षेत्राकडे जाणार्‍या कर्मचार्‍यांचं प्रमाण कमी होईल अशी सरकारला आशा वाटतेय.

close