अरुण गवळींची सेना ताकदिनिशी निवडणुकीत उतरणार

January 12, 2012 9:53 AM0 commentsViews: 48

12 जानेवारी

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत माजी आमदार गँगस्टर अरुण गवळी याची अखिल भारतीय सेना मोठ्या प्रमाणात पूर्ण ताकदिनिशी उतरण्याच्या तयारीत आहे. मुंबई सह राज्यात ज्या ज्या महानगर पालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्या त्या ठिकाणी गवळीचे उमेदवार असणार असल्याची माहिती खुद्द गवळी यांनीच दिली आहे. गवळी यांच्या अखिल भारतीय सेना य पक्षाचे मुंबईत दोन नगर सेवक आहेत. त्यांची मुलगी गीता गवळी हि भायखळा येथील वॉर्ड क्रमांक 205 येथून निवडून आली आहे. तर गवळीचंी वहिनी वंदना प्रदीप गवळी या वार्ड क्रमांक 204 येथून निवडून आल्या आहेत. दक्षिण मध्य मुंबईत गेल्या अनेक वर्षा पासून गवळींचा दबदबा आहे. गवळींचा अखिल भारतीय सेना हा पक्ष मुंबईत किमान 26 ठिकाणी उमेदवार उभा करणार असल्याच गवळी यांनी सांगितले आहे.

close