सांगलीत मांडूळ तस्करांची टोळी जेरबंद

January 12, 2012 7:51 AM0 commentsViews: 246

12 जानेवारी

सांगली जिल्ह्यात मांडूळाची तस्करी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. मिरज पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 12 लाख रुपये किमंतीचे तीन मांडूळ साप जप्त केले आहेत. खंडेराजुरी गावात छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. मांडूळ सापाला आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधीची किंमत मिळते. मांडूळाला दुंतोडी साप म्हणतात. या गावात बेकायदेशीर पणे सापाची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्याच आधारे हा छापा टाकण्यात आला.

close