शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उतरणार प्रचारात

January 12, 2012 11:00 AM0 commentsViews: 80

12 जानेवारी

मुंबईतला महानगरपालिकेचा गड राखण्यासाठी आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही प्रचारात उतरणार आहेत. बाळासाहेब ठाकरे मुंबई ठाण्यात सभा घेणार आहेत. मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक सभा ते घेणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी पहिल्यांदाच काँग्रेस, राष्ट्रवादीने मुंबईत आघाडी केली आहे. आणि शिवसेनेची सतरा वर्षाची सत्ता उलटून लावण्यासाठी आघाडीची शपथ घेतली.त्यामुळे आघाडी आणि महायुतीत तुंबळ युद्ध रंगणार आहे. आता आघाडीला टक्कर देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे प्रचारात उतरले आहेत. बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यात झालेल्या भाषणानंतर शिवसैनिकांना या निमित्त ही भेटच ठरणार आहे.

close