गर्भलिंग निदान प्रकरणी 3 डॉक्टरांना जामीन

January 12, 2012 11:21 AM0 commentsViews: 31

12 जानेवारी2005 मधल्या बीडमधल्या गर्भलिंग निदान प्रकरणी तीन डॉक्टर्सना जामीन मिळाला आहे. त्यांना बीडमधल्या कोर्टाने आजच 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. डॉ. अरूण सातपुते, माधव सानप, सय्यद तारेक अशी या तीन डॉक्टर्सची नावं आहेत. 2005 मध्ये डॉ. सानप क्लिनिकमध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं होतं. त्यात गर्भलिंग निदान होत असल्याचं आढळलं होतं. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी हे स्टींग ऑपरेशन केलं होतं. या प्रकरणात बुधवारी कोर्टाने 3 डॉक्टर्सना दोषी ठरवलं होतं. डॉ. सानप यांना कोर्टात नेलं जात असताना कोर्टाच्या आवारात त्यांना काळं फासण्याचा प्रयत्न एका तरुणानं केला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

close