मुलींच्या शासकीय वसतीगृहात रॅगिंग ?

January 12, 2012 11:35 AM0 commentsViews: 9

12 जानेवारी

नागपूरच्या सिविल लाईन्स भागात असलेल्या संत मुक्ताबाई या मुलींच्या सरकारी वसतीगृहात रॅगिंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन बहिणींनी रॅगिंगची तक्रार केली आहे. काही सीनिअर विद्यार्थिनींनी रॅगिंग केल्याची त्यांची तक्रार आहे. या मुली आपल्याला मारहाण करतात तसेच मानसिक त्रास देतात असा या दोन बहिनींनी आरोप केला आहे. त्यामुळे वसतीगृह प्रशासनाने तीन विद्यार्थिनींना रेस्टिकेट केलं आहे. पण या मुलींनी रॅगिंग केल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवल्याचा आरोप त्यांनी केला. रेस्टिकेट करण्यात आलेल्या या मुली आज समाजकल्याण अधिकार्‍यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वसतिगृहातल्या इतर मुलीही हजर होत्या. या मुलींवरची तक्रार खोटी असल्याचा इतर मुलींचा दावा आहे.

close