साध्वीसह 11 आरोपींवर मोक्का

November 20, 2008 1:12 PM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबर, मुंबई मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरसह 11 जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. एटीएसनं आरोपींवर मोक्का लावण्यासंदर्भात केलेली मागणी नाशिक कोर्टानं आज मान्य केली. एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा संघंटित गुन्हा असल्यानं आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी एटीएसनं केली होती. दरम्यान, एटीएसच्या तपासावर कुठलाही राजकीय दबाव नसल्याचं करकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

close