झरदारी दुबईला ; पाकवर अस्थिरतेचं संकट

January 12, 2012 2:05 PM0 commentsViews: 2

12 जानेवारी

पाकिस्तानात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेची भीती निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसीफ अली झरदारी आज अचानक दुबईला रवाना गेले आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव ते दुबईला गेल्याचं राष्ट्राध्यक्षांच्या सूत्रांनी सांगितले. पण पाकिस्तानाच्या संसदेचं आज विशेष संयुक्त अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. त्याआधीच राष्ट्राध्यक्ष देशाबाहेर गेल्याने अनेक चर्चांना ऊत आला आहे. झरदारी दुबईत माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची भेट घेणार असल्याचंही समजतंय. दरम्यान, उद्भवलेल्या परिस्थितीचा पाकिस्तान परिपक्वतेनं सामना करत असल्याचे गिलानी यांनी म्हटलं आहे. तर लष्कर प्रमुख अशफाक परवेझ कियानी यांनी आज कोअर कमांडर्सचीही बैठक बोलावली होती.

close