राज्य सहकारी बँक वाचवण्यासाठी सरकारच्या हालचाली

January 13, 2012 9:50 AM0 commentsViews: 9

13 जानेवारी

राज्य सहकारी बँक आणि 9 जिल्हा बँकांना वाचवण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला पत्र लिहिलंय. या बँकांना लायसन्स मिळवण्यासाठी आणखी 3 ते 6 महिन्यांची मुदत मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. रिझर्व्ह बँकेने या बँकांना लायसन्स मिळवण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीत लायसन्स मिळालं नाही तर या बँकांचं पतपेढीत रूपांतर होऊ शकतं.

close