अवैध खनिज वाहतूक करणारे 16 ट्रक सोडले

January 13, 2012 9:54 AM0 commentsViews: 2

13 जानेवारी

सिंधुदुर्ग जिल्हातून गुजरातकडे अवैध खनिज वाहतूक करणारे 16 ट्रक काल जप्त करण्यात आले होते. पण हे सर्व ट्रक खनिकर्म विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशी करुन सोडून दिले आहे. त्यामुळे या अधिकार्‍यांच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. गोव्यातल्या शुभंकर मिनरल्स रिसोर्सेस कंपनीचे हे ट्रक आहेत. या ट्रकमध्ये जवळपास 25 कोटी रुपयांचं खनिज होतं. कुठलाही परवाना नसताना हे ट्रक गुजरातला जात होते. गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे हे ट्रक जप्त करण्यात आले. पण जप्तीच्या कारवाईच्यावेळीसुद्धा खनिकर्म विभागाने दिरंगाई केल्याचा गावकर्‍यांचा आरोप आहे.

close