लैंगिक अत्याचार प्रकरणी प्राध्यापकाची हकालपट्टी

January 12, 2012 2:12 PM0 commentsViews: 6

12 जानेवारी

कोल्हापुरातही शिवाजी विद्यापीठातल्या फिजिक्स डिपार्टमेंटच्या एका विद्यार्थिनीनं लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आहे. या प्रकरणी फिजिक्सचे प्राध्यापक डॉ. ए. व्ही. राव यांना विद्यापीठ प्रशासनाने निलंबित केलं आहे. राव यांना शैक्षणिक कामासाठी भेटायला गेल्यानंतर त्यांनी लैंगिक अत्याचार केला असा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे. या बाबतची लेखी तक्रार संबधित विद्यार्थीनीने विभाग प्रमुखांकडे दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारावर विद्यापीठ प्रशासनाने राव यांच्यावर निलंबनाची कारवाई केलीय. विद्यापीठ प्रशासन या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

close