भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा फोडले आपलेच कार्यालय

January 13, 2012 4:25 PM0 commentsViews: 2

13 जानेवारी

मुंबईत महायुती आणि आघाडीचं जागावाटप पूर्ण झाल्यानंतर सर्वच पक्षांमध्ये नाराजीचे सूर उमटायला लागले आहे. शिस्तबध्द पक्ष असं सांगण्यार्‍या भाजपमध्येच याची पहिली ठिणगी पडली. दुसर्‍या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाही तर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाच्या दोन विभागांच्या ऑफिसची तोडफोड केली. सोमवारी चेंबूर इथल्या जिल्हा कार्यालयाची तोडफोड झाली. वार्ड क्रमांक 134 ची जागा शिवसेनेचे राहुल शेवाळे यांच्यासाठी सोडण्याच्या वादावरुन कार्यकर्ते संतापले होते. तर काल वॉर्ड 192 महालक्ष्मी रेसकोर्स हा वॉर्ड शिवसेनेला सुटल्यामुळे भाजप कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.आणि त्यांनी आपल्याच कार्यालयाची तोडफोड केली. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक छोटू देसाई यांचा प्रतिकात्मक पुतळाही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जाळला. भाजपकडून मनिषा पवार इच्छूक उमेदवार होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अशा संतापानंतर आता सवाल विचारला जातोय की ही महायुती एकोप्याने निवडणुका लढवणार का ?

close