पुणे फिल्म फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा थाटात

January 12, 2012 3:12 PM0 commentsViews: 4

12 जानेवारी

दरवर्षी प्रमाणे यंदाही पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल म्हणजेच पिफचं उद्घाटन मोठं शानदार झालंय. श्रीराम लागू यांच्या हस्ते या फेस्टिवलचे उद्घाटन झाले. यावेळी सांस्कृतिक मंत्री संजय देवताळेही हजर होते. यावेळी राणी मुखर्जी आणि आयर्लंडचे भारतातील राजदूत गुडमुंड एरिकसन यांची विशेष उपस्थिती होती. पिफचं हे 10वं वर्ष. अमिताभ बच्चन आणि आशा भोसले यांना आउटस्टँडिंग काँट्रिब्युशन ऑफ इंडियन सिनेमा हा पुरस्कार दिला गेला. तर संगीतकार इलायाराजा यांना सचिन देव बर्मन पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. करियरची 50वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सचिन पिळगावकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या महोत्सवात 240 सिनेमे 6 वेगवेगळ्या थिएटर्समध्ये 10 स्क्रीन्सवर दाखवले जाणार आहे तसेच हे फेस्टिव्हल 19 जानेवारीपर्यंत सुरू असणार आहे.

close