कॅटमध्ये महाराष्ट्रातील 2 मुलांनी मारली बाजी

January 13, 2012 12:03 PM0 commentsViews: 2

13 जानेवारी

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट या प्रवेश परीक्षा कॅटमध्ये महाराष्ट्रातल्या दोन मुलांनी बाजी मारली. अंबरनाथचा अजिंक्य देशमुख आणि मुंबईचा शशांक प्रभू या दोघांनी शंभर टक्के मार्क्स मिळवले आहे. देशभरातून फक्त 9 विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मार्क्स मिळवले आहेत. त्यामध्ये या दोघांचा समावेश आहे. शशांक हा दिल्ली विद्यापीठाच्या फॅकल्टी मॅनेजमेंट स्टडीज मध्ये शिकवतो.शशांकने एमबीबीएस केलं आहे. त्याने तिसर्‍या प्रयत्नात हे यश मिळवलं आहे. अजिंक्यने मद्रास आयआयटीमधून काम्प्युटर सायसन्समध्ये पदवी मिळवली आहे त्याचाही हा तिसरा प्रयत्न होता.

close