पोलिओविरुद्धचा लढा भारताने जिंकला !

January 13, 2012 12:25 PM0 commentsViews: 5

13 जानेवारी

'दो बुंद जिंदगी के' हे ब्रीदवाक्य घेऊन पोलिओविरुद्धचा लढा भारताने जिंकला आहे. गेल्या वर्षभरात पोलिओची एकही केस आढली नाही. त्यामुळे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननंही भारताचं कौतुक केलं आहे. तसेच इतर देशांनीही भारतापासून शिकावे असं आवाहन डब्लू.एच.ओ (WHO) नं केलं आहे. त्यामुळे पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून भारताचे नाव लवकरच काढण्यात येईल.

पोलिओ निर्मुलनासाठी भारत सरकारने मोठी मोहीम हाती घेतली. गेल्या काही वर्षात 24 लाख वॉलेंटिअर्स आणि दीड लाख कार्यकर्त्यांची मदत घेण्यात आली. जवळपास हजार कोटी रुपये खर्च आला. आणि अखेर पोलिओ निर्मुलनात भारताला यश आलंय. पश्चिम बंगालमधल्या हावडा जिल्ह्यातली दोन वर्षांची रुखसाना ही पोलिओची शेवटची रुग्ण होती. आता तिचे वडिलच पोलिओविषयी जनजागृती करत आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेत दरवेळी जवळपास 17 कोटी मुलांना पोलिओ लस दिली जाते. पण आव्हान इथेच संपत नाही.

देशात गेल्या वर्षी पोलिओचा एकही रुग्ण आढळला नसला तर लढा अजून संपलेला नाही. आपल्याला सतत सतर्क राहण्याची गरज आहे. पण सध्या तरी पाकिस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तान अशा पोलिओग्रस्त राष्ट्रांच्या यादीतून भारताचे नाव लवकरच वगळण्यात येणार आहे.

close