पुण्यात भाजपमधील मतभेद उघड

January 12, 2012 5:49 PM0 commentsViews: 6

12 जानेवारी

मुंबईप्रमाणेच पुण्यातही निवडणुकीमुळे वातावरण तापलं आहे. पुण्यात युतीची घोषणा झाली नसतानाच भाजपमध्ये अंतर्गत मतभेदांनी डोकं वर काढलं आहे. पुण्यात झालेल्या विनोद तावडेंच्या सत्काराला मुंडे गाटाच्या नेत्यांनी दांडी मारली. त्यामुळे गडकरी आणि मुंडे गटातले मतभेद निवडणुकीच्या तोंडावर स्पष्टपणे पुढे आले आहे. योगेश गोगावले, माधुरी मिसाळ, मुक्ता टीळक, अनिल शिरोळे, मुरलीधर मोहोळ आणि दिलीप कांबळे हे सर्व मुंडे गटातले नेते वेगवेगळी कारणं देऊन कार्यक्रमापासून दूर राहिले. तावडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाल्यानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्टेजवर फक्त विकास मठकरी, गिरीश बापट आणि भिमराव तापकीर यांच्यासारखे गडकरी गटाचे नेते उपस्थित होते.

close