आदिवासींवर अत्याचार प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

January 12, 2012 5:53 PM0 commentsViews: 3

12 जानेवारी

द ऑब्जर्व्हर या ब्रिटिश दैनिकाने अंदमानमध्ये पर्यटकांसाठी जारवा या आदिवासी जमातीच्या महिलांना जबरदस्तीने नाचायला भाग पाडण्यात येत असल्याचे एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या प्रकरणी अंदमान पोलिसांनी व्हिडिओ शूट करणार्‍या अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जारवांसाठीच्या संरक्षित जंगलात जाणार्‍या 15 व्यक्तींना अटक करण्यात आलीय. त्यामुळे अंदमानच्या प्रशासकीय यंत्रणा आता जारवांच्या सुरक्षिततेबद्दल सतर्क झाल्याचं दिसतं आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही आदिवासींचा हा व्हिडिओ 3 ते 4 वर्ष जुना असल्याचं सांगितले आहे. या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही. तत्काळ कारवाई केली जाईल असं आश्वासन दिले आहे.

close