ठाण्यात कुख्यात गुंड नाडर सिंग ठार

January 13, 2012 4:58 PM0 commentsViews: 5

13 जानेवारी

ठाण्यातील शिवाई नगर परिसरात शिकल्गार टोळीचा म्होरक्या नाडारसिंग हत्या झाली आहे. नाडारची पत्नी आणि त्याच्या 10 साथीदारांनी चाकू चे वार करुन आणि नंतर तीन गोळ्या घालून त्याची हत्या केली. वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दोन जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे. नाडार याच्यावर ठाण्यासह महाराष्ट्रातल्या अनेक पोलीस स्टेशन्समध्ये अनेक गुन्हे दाखल होते. चोरी करणारी टोळी म्हणून ही टोळी ओळखली जाते. नाडारची पत्नी आणि नाडारमध्ये वाद होते. त्यातच नाडारने आपल्याच टोळीबद्दल पोलिसांना खबर दिल्याचा संशय आल्याने त्याच्या टोळीतल्या लोकांनी त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जात असताना काही नागरिकांनी त्यांना पाहिलं आणि ही हत्या उघडकीस आली.

close