आघाडीच्या उमेदवारांच्या शक्तीप्रदर्शनामुळे वाहतुकीची कोंडी

January 13, 2012 9:02 AM0 commentsViews: 3

13 जानेवारी

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इच्छूकांच्या मुलाखती चिंचवड आणि भोसरी परिसरात आयोजित करण्यात आल्या होत्या. या मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करण्यासाठी म्हणून आपल्या सोबत शेकडो वाहनांचा ताफा आणला होता. त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर वाहतुकाची कोंडी झाली. शक्तीप्रदर्शन करु नका असे आवाहन पक्षनेत्यांनी केल्यावरही उमेदवारांनी अशा पद्धतीने शक्ती केल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. उद्याही राष्ट्रवादीच्या मुलाखती आहेत.

close