कुशवाह प्रकरणावरून भाजपात तणाव कायम

January 13, 2012 4:47 PM0 commentsViews: 3

13 जानेवारी

बाबूसिंग कुशवाह प्रकरणावरून उत्तरप्रदेशात भाजपमध्येही अजून तणाव कायम आहे. गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी पूर्वांचलमध्ये पक्षासाठी प्रचार करणार नाही, असं स्पष्ट केलंय. भ्रष्टाचारी लोकांना पक्षात प्रवेश दिल्याने पक्षाची बदनामी झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बहुजन समाज पक्षाचे माजी आमदार बाबुसिंग कुशवाह यांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपमध्ये मोठी खळबळ माजली होती. नंतर त्यांचं पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात आलं. पण त्यामुळे निर्माण झालेला वाद मात्र कायम आहे.

close