मनसेच्या इच्छुक उमेदवारांना कामाचं गाजर !

January 14, 2012 9:42 AM0 commentsViews: 3

14 जानेवारी

बंडखोरी टाळण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष संघटनेच्या कामाचं गाजर पुढे केलं आहे. नाशिकमध्ये काल शुक्रवारी त्यांनी एका दिवसात 650 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी उमेदवारी नाही मिळाली तर पक्ष संघटनेचं काम कराल का ? असं उमेदवारांना विचारण्यात आलं. त्यामुळे परीक्षेनंतर उत्साहात आलेल्या बर्‍याचशा उमेदवारांच्या उत्साहावर पाणी पडलंय. इच्छुकांची मोठी संख्या असलेल्या मनसेला तेवढाच मोठा बंडखोरीचाही धोका आहे. त्यातच नवीन येणार्‍याला संधी दिली जाईल मात्र त्यांनाही परीक्षा द्यावी लागेल अशी गुगली राज ठाकरेंनी टाकल्यामुळे नाशिकच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

close