राहुल गांधी आणि रिटा बहुगुणा यांना नोटीस

January 14, 2012 4:17 PM0 commentsViews: 4

14 जानेवारी

काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रिटा बहुगुणा यांना आझमगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी नोटीस बजावली आहे. शिबली कॉलेजमधल्या शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. राहुल गांधी यांनी शिबली कॉलेजच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केला होता. बाटला हाऊस एन्काऊंटर प्रकरणी राहुल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत विद्यार्थ्यांनी निदर्शनं केली होती. यामुळे शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप राहुल यांच्यावर करण्यात आला होता.

close