अवैध वृक्षतोड प्रकरणी वनक्षेत्राधिकारी, वनपाल निलंबित

January 14, 2012 12:01 PM0 commentsViews: 57

14 जानेवारी

कर्जत वन विभागाचे वनक्षेत्राधिकारी साहेबराव बोंगाणे आणि खांडपे रेंजचे वनपाल पी. बी. बागल यांना निलंबित करण्यात आले आहे. अवैध उत्खनन आणि अवैध वृक्षतोडप्रकरणी सरकारचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली तर खांडपे रेंजचे वनरक्षक शंकर पवार यांना शोकॉज नोटीस बजावण्यात येणार आहे. त्याची एक कॉपीच आयबीएन लोकतमतच्या हाती लागली आहे. त्यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहेत. कर्जत तालुक्यातील कोंडणा इथं उल्हास नदीवर कोंडणे धरणाला 81 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. धरणाला 443 हेक्टर जमीन लागणार असून त्यातील 261 हेक्टर जमीन ही वनविभागाची घेण्यात येणार आहे. मात्र कुठलीही पूर्वपरवानगी न घेता, इथल्या वनअधिकार्‍यांनीच ठेकेदार आणि पाटबंधारे अधिकार्‍यांच्या संगनमताने अंदाजे 40 लाख रुपये किमतीच्या मातीचं उत्थनन केलं. त्याचबरोबर त्यावरील शेकडो झाडांची कत्तलही केली. त्यामुळे तब्बल 16 हेक्टरवरील जंगल संपूर्णपणे नष्ट झालं आहे.

close