काँग्रेसची अनोखी शक्कल ; उमेदवारांना हमीपत्र देण्याची सक्ती

January 14, 2012 4:25 PM0 commentsViews: 38

14 जानेवारी

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांना पक्षाच्या मुलाखतीसाठी उमेदवारी अर्जाचं वाटप सुरु केलं आहे. पण या अर्जांबरोबरच काँग्रेसनं इच्छुक उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेणार आहे. या हमीपत्राच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष संभाव्य बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न करीत आहे. पण त्याचवेळी हा इच्छुक उमेदवारांना धाक दाखवण्याचा प्रकार असल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.

या हमीपत्रामध्ये इच्छुक उमेदवाराने काय जाहीर करायचे ?

''मला जरी पक्षाचे तिकीट मिळाले नाही तरी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही. मी जर का निवडणुकीला उभा राहिलो तर हे माझे हमीपत्र पक्षानं माझा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचं पत्र समजावं. पक्षाला माझे हे पत्र निवडणूक अधिकार्‍याला जसेच्या तसे सादर करण्याचा अधिकार मी प्रदान करतो आहे…''

close