औरंगाबादच्या सिटीझन जर्नलिस्ट विद्यार्थ्यांची महाविद्यालयानं घेतली दखल

November 20, 2008 1:30 PM0 commentsViews: 6

20 नोव्हेंबर, मुंबई शेखलाल शेख औरंगाबाद शहरातील शासकीय चित्रकला महाविद्यालयातील समस्या 'आयबीएन लोकमत ' चे सिटीझन जर्नलिस्ट बनलेल्या विद्यार्थ्यांनी मांडल्या होत्या. याची दखल घेत कला संचालनालयाचे डायरेक्टर रविंद्र बाळापुरे यांनी महाविद्यालयास भेट देत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासकीय कला महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाही आणि याच समस्या दाखवण्यासाठी इथले विद्यार्थी आयबीएन लोकमतचे सिटीझन जर्नलिस्ट झाले होते. आयबीएन लोकमतच्या बातमीनंतर या समस्या जाणून घेण्यासाठी कला संचलनालयाचे डायरेक्टर रविंद्र बाळापुरे यांनी महाविद्यालयाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर या समस्या अगोदरच सरकार दरबारी मांडल्या होत्या, असं महाविद्यालयाचे डीन कमलेश मेश्राम यांनी सांगितलं. याबाबतीत कला संचालनायलचे डायरेक्टर रविंद्र बाळापुरे यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. पण आयबीएन लोकमतच्या माध्यमातून सिटीझन जर्नलिस्ट बनलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दखल त्यांना घ्यावीच लागली आहे. आता विद्यार्थी आपल्या समस्या सरकार दरबारी मांडणार आहेत.

close