धनंजय मुंडेंवरील कारवाईबाबत 2 दिवसात निर्णयाची शक्यता

January 14, 2012 1:35 PM0 commentsViews: 6

14 जानेवारी

पक्षाचा आदेश पाळला नसल्याने धनंजय मुंडे यांच्यावर कोणती कारवाई करावी यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल तयार केला आहे. समितीचे प्रमुख गोविंद केंद्रे यांनी सर्व बाबींचा अभ्यास करुन हा अहवाल तयार केला. हा अहवाल दोन दिवसामध्ये प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे दिला जाणार आहे. त्यानंतर कारवाई काय करायची हे पक्ष ठरवणार असल्याचे केंद्रे यांनी सांगितले. परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचा आदेश झुगारुन आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थक नगरसेवकाला नगराध्यक्ष केलं. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी समिती स्थापन केली होती..आता या समितीचा अहवाल आल्यानंतर पक्ष कोणती कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close