आता स्वत:चा फोटो असलेलं पोस्टाचं तिकीट मिळणार

January 14, 2012 12:48 PM0 commentsViews: 3

प्राची कुलकर्णी, पुणे

14 जानेवारी

दिग्गजांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांच्या नावाचे पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जातात. पण असेच आपल्या स्वतःचे तिकीट मिळालं तर ? हो असंही होऊ शकणार आहे. स्वत:चा फोटो असलेलं पोस्टाचं तिकीट आता मिळू शकतं. पुण्यामध्ये सध्या भरलेल्या महापेक्स प्रदर्शनामध्ये अनेकांनी स्वत:चं तिकीट काढून घेतलंय.

पुर्वी पोस्टात गेलं की वेगवेगळ्या किंमतीची तिकीटं खरेदी करताना आपल्याला कोणाचं तिकीट मिळणार याची एक वेगळीच एक्साईटमेंट असायची.. भारताच्या वैभवात भर घालणार्‍या अनेक दिग्गजाचा गौरव करण्यासाठी पोस्टाने तिकीटं प्रकाशित केली. पण याच तिकीटावर जर आपला फोटो आला तर… नुसती कल्पनाच एक्सायटिंग आहे ना. पण आता हे शक्य झालंय ते… पुण्यातील बालेवाडीत भरलेल्या महापेक्समध्ये.. जिथे तुम्हाला तुमचं स्वत:चं तिकिट काढून मिळतंय.

आपले स्टॅप काढून घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती..यात पोस्टाचे कर्मचारीही मागे नव्हते. एसएमएस ई- मेलच्या जमान्यात पोस्ट काहीसं मागं पडतंय. पण अशा अनोख्या कल्पक प्रयत्नांतून पोस्टाला नक्कीच उभारी मिळण्यात मदत होईल यात शंका नाही.

close