‘ भैय्या हातपाय पसरी ‘ वर बंदी नाही – आर. आर.पाटील

November 20, 2008 1:33 PM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबर, मुंबई 'भैय्या हातपाय पसरी ' या नाटकांवर बंदी घातली जाणार नाही, असा खुलासा उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी केला आहे. परप्रांतीयाच्या प्रश्नावर ' देशद्रोही ' चित्रपटावरील बंदी घालण्यात आली होती.त्या पार्श्वभूमीवर या नाटकावर बंदी घालण्याची मागणी होत होती. पोलिसांनी नाटकांची संहिता नाट्य सेन्सॉर बोर्डाकडून मागवून घेतली होती. दरम्यान, या नाटकावर कोणतीही बंदी लागू होणार नाही, असं आज उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी यांनी याबाबत सरकारचे आभार मानले आहेत. नाटक विनोदी असून आक्षेर्पाह असं काहीच नाही, असं कांबळी म्हणाले.

close