भाऊबंदकीत फसला पुन्हा आघाडीचा गाडा

January 14, 2012 1:20 PM0 commentsViews: 2

14 जानेवारी

मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी तर झाली आहेत पण जागावाटपाचा तिढा मात्र पूर्णपणे सुटलेला नाही. आघाडीचं गाडं भाऊबंदकीत अडकलं आहे. मुलगा, भाऊ, भाचा आणि वहिनीला वॉर्ड मिळण्यासाठी आघाडीचे नेते आपआपसात भांडत आहे. राष्ट्रवादीचे मुंबईतले नेते सचिन अहिरना लहान भाऊ लालीभाईसाठी भायखळ्यातील वॉर्ड क्रमांक 193 हवा आहे. पण ही जागा काँग्रेसच्या क्रमांक 2 च्या उमेदवाराची असल्याने त्यांची अडचण झाली आहे.

काँग्रेसचे खासदार गुरुदास कामत यांना भाचा समीर देसाईसाठी गोरेगावमधला वॉर्ड क्रमांक 50 हवा आहे. पण, हाच वॉर्ड राष्ट्रवादीला कामगार नेते शरद राव यांचा मुलगा शशांक राव यांच्यासाठी हवा आहे. राष्ट्रवादीचे खासदार संजय दिना पाटील यांना त्यांची वहिनी प्रमिला पाटील यांच्यासाठी एका वॉर्डची अदलाबदल हवीय. त्यांना भांडूपमधला वॉर्ड क्रमांक 111 हा काँग्रेसच्या वॉर्ड क्रमांक 109 बरोबर बदलून हवा आहे. अशा प्रकारे आघाडीच्या भाऊबंदकीत चार जागांचा तिढा निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता आघाडीचे नेते पुन्हा एकदा सोमवारी चर्चेसाठी एकत्र बसणार आहेत.

close