पहिल्या महिला फोटोग्राफर होमी व्यारावाला यांचं निधन

January 15, 2012 1:10 PM0 commentsViews: 13

15 जानेवारी

भारतातल्या पहिल्या महिला फोटोग्राफर आणि पद्मविभूषण होमी व्यारावाला यांचं आज निधन झालं. त्या 99 वर्षांच्या होत्या. 1938 मध्ये होमी यांनी फोटोग्राफर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. आपल्या कारकिर्दीत त्यांनी पंडित नेहरु, महात्मा गांधी यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांच्या छबी कॅमेराबद्ध केल्या. आपल्या कॅमेरात दुर्मिळ क्षण टिपणं ही त्यांची खासियत. त्यांनी क्लिक केलेले ब्लॅक ऍण्ड व्हॉईट फोटो स्वतंत्र भारताच्या अशा अनेक क्षणांचे साक्षीदार आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या फोटोग्राफ्सवरचं 'कॅमेरा क्रोनिकल्स' हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. होमी व्यारावाला यांचा जन्म एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात 1913 मध्ये गुजरातमधल्या नवसारी इथे झाला. लग्नानंतर 1942 मध्ये त्या दिल्लीत वास्तव्यासाठी गेल्या. कमर्शिअल फोटोग्राफीमधून 1970 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2011 मध्ये त्यांचा पद्मविभूषण देऊन गौरव करण्यात आला होता.

close