पाकमध्ये शक्तिशाली बॉंबस्फोटात 13 जण ठार

January 15, 2012 1:17 PM0 commentsViews: 3

15 जानेवारी

पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात एक शक्तिशाली बाँबस्फोट झाला. त्यात 13 जणांचा मृत्यू तर 20 जणं जखमी झाले आहेत. पंजाब प्रांतातल्या खानपूर शहरात एका शिया कार्यक्रमात हा स्फोट झाला. या कार्यक्रमात सुमारे दिडशे लोक सहभागी झाले होते. पाकिस्तानात शिया आणि सुन्नी या दोन समाजांमध्ये तेढ आहे, ज्यामुळे अनेक वर्षांपासून हिंसक घटना घडल्या आहेत. पण आजच्या घटनेची जबाबदारी अजूनपर्यंत कोणत्याही संघटनेनं घेतली नाही.

close