गिलानी यांची राजीनामा देण्याची तयारी ?

January 16, 2012 5:34 PM0 commentsViews: 5

16 जानेवारी

पाकिस्तानमधला राजकीय तणाव अजून कायम आहे. पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवल्याचे समजतंय. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात आज एनआरओ (NRO) प्रकरणी सुनावणी झाली. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि इतर काही बड्या राजकारण्यांविरोधात भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा चालवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. पण हे आदेश गिलानींनी पाळले नसल्याने कोर्टाने त्यांना नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देण्याची मुदत आज संपत असूनही गिलानी यांनी काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे कोर्टाने त्यांना अवमानाची नोटीस बजावली. आणि 19 तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले.

त्यानुसार गिलानी कोर्टात हजर राहून दिलगिरी व्यक्त करणार आहेत असं समजतंय. गिलानी यांनी आज सत्ताधारी पाकिस्तान पिपल्स पार्टी आणि इतर घटकपक्षांची एक तातडीची बैठक घेतली. सरकार आणि संसद यांच्या हितासाठी राजीनामा द्यायला तयार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. दुसरीकडे मेमोगेट प्रकरणीही असिफ अली झरदारी अडचणीत आलेत. या प्रकरणातले मुख्य साक्षीदार मन्सूर इजाझ सुप्रीम कोर्टात हजर राहण्यासाठी 24 जानेवारी पर्यंत पाकिस्तानात येणार आहेत.

पाकिस्तानी लष्कर उठाव करण्याची शक्यता आहे त्यामुळे अमेरिकेनं मदत करावी, अशी मागणी राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी अमेरिकन सरकारकडे केल्याचा आरोप आहे. त्यात मन्सूर इजाझ या पाकिस्तानी उद्योगपतींनी मध्यस्थी केली होती. एनआरओ (NRO) आणि मेमोगेट या दोन्ही प्रकरणात असिफ अली झरदारी अडचणीत आल्यानं सरकारवरचं संकट कायम आहे.

एनआरओचा वाद नेमका काय आहे ?- नॅशनल रिकन्सिलिएशन ऑर्डिनन्स म्हणजेच राष्ट्रीय सामंजस्य अध्यादेश- माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी 2007 मध्ये अध्यादेश काढला- या अध्यादेशानुसार राजकारणी, अधिकार्‍यांवरचे गुन्हे माफ – हत्या आणि भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप माफ- या अध्यादेशामुळेच बेनझीर भुत्तो पाकिस्तानात परतल्या- पण, पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हा अध्यादेश धुडकावला- 2009 – पंतप्रधान गिलानींच्या आदेशानुसार एनआरओच्या लाभाथीर्ंची यादी जाहीर – या सर्व नेत्यांवर खटले भरण्याचा कोर्टाचा आदेश – यात पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांचंही नाव

close