पद्मसिंह पाटील यांचा साक्षीदारांवर दबाव : सीबीआय

January 16, 2012 3:28 PM0 commentsViews: 4

16 जानेवारी

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पद्मसिंह पाटील यांचा जामीन अर्ज रद्द करावा यासाठी सीबीआयने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. काँग्रेसचे नेते पवन राजे निंबाळकर यांच्या प्रकरणात पद्मसिंह हे आरोपी आहेत. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्या नंतर पद्मसिंह पाटील हे साक्षीदारांवर दबाव टाकत आहेत. यामुळे अनेक साक्षीदार आपली साक्ष बदलत असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. यामुळे सीबीआयने पद्मसिंह पाटील यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली आहे. त्यावर पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांना त्यांचं म्हणणं मांडण्याचे आदेश हायकोर्टाने आज दिला आहे. यावर पुढील सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

close