नाना पाटेकरांच्या उपस्थित रस्ता सुरक्षा अभियानाचा समारोप

January 16, 2012 4:08 PM0 commentsViews: 11

16 जानेवारी

नवी मुंबईमधे रस्ता सुरक्षा अभियानाचा आज समारोप झाला. पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्यासह प्रसिध्द कलाकार नाना पाटकेर आणि शंकर महादेवन हे या कार्यक्रमाला खास उपस्थित होते. या कार्यक्रमात नवी मुंबई परिसरातील एनसीसी, आरएसपीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केलं. या सप्ताहात आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांना नाना पाटेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ठ्य म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेलं लेझिम नृत्य.आपल्या प्रात्यक्षिकात लेझिम पथकाने सादर केलेल्या, रस्ता सुरक्षेचं महत्व सांगणा-या परिवहन खात्याच्या विविध चिन्ह्यांच्या प्रतिकृतीला उपस्थितांनी जोरदार दाद दिली.

close