नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहनांची जाळपोळ

January 16, 2012 11:39 AM0 commentsViews: 2

16 जानेवारी

नाशिकमध्ये पुन्हा एकदा गाड्या पेटवून पोलिसांना आव्हान देण्याचा प्रकार झाला आहे. विजयनगरजवळ पहाटे अज्ञात इसमांनी 3 टेम्पो पेटवून पोबारा केलाय.आगीच्या भडक्यानं लोक गोळा झाल्याने शेजारी उभ्या असलेल्या इतर गाड्यांची आग आटोक्यात आणण्यात आली. अन्यथा मोठा घातपात होण्याची शक्यता होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हा प्रकार घडला असल्याचा अंदाज आहे. तीन वर्षांपूर्वी पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केल्यावर गाड्या जाळण्याचा प्रकार झाला होता. सध्याही पोलिसांतर्फे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हद्दपारी, स्थानबद्धता आणि झाडाझडती सुरू आहे. मोरवाडीजवळ झालेल्या या जाळपोळीचा तपास अंबड पोलीस करताहेत.

close