इटलीत जहाज अपघातात भारतीय तरुण सुखरुप

January 16, 2012 12:29 PM0 commentsViews: 8

16 जानेवारी

इटलीमधल्या कोस्टा काँकार्डिया क्रूझला काल अपघात झाला. यातल्या प्रवाशांसाठीचं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे. 5 प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. तर 6 जणांचा बळी गेला आहे. या अपघाताला आता 50 तास उलटून गेले आहेत. या क्रूझवर 130 भारतीय प्रवासी होते. यातला एक प्रवासी बेपत्ता असल्याची शक्यता आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या प्रवाशांच्या मदतीसाठी तातडीने प्रयत्न सुरु केले असल्याचे परराष्ट्र सचिव विश्वेश नेगी यांनी सांगितले आहे. खडकावर आदळल्याने या क्रूझला अपघात झाला आणि बोट कलंडली. बोटीवर जवळपास 4000 प्रवासी होते. याचं जहाजेवर असलेला कळव्याचा मयुर कदम या दुर्घटनेतून सुखरुप बचावला आहे. त्याचे आईवडिल आता मयूरची वाट बघत आहे.

close