मालेगाव बॉम्बस्फोटातील संशयित एकाच व्यासपीठावर

November 20, 2008 1:38 PM0 commentsViews: 2

20 नोव्हेंबर, मुंबई मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील तपासाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. आयबीएन लोकमतच्या हाती आलेल्या एका व्हीडियोमध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित एकाच मंचावर दिसत आहेत. सीएनएन आयबीएनच्या हाती सगळ्यात आधी लागलेला व्हीडियो या वर्षीच्या 12 एप्रिलला भोपाळमध्ये चित्रित केला गेलाय. यात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, स्वयंघोषित शंकराचार्य दयानंद पांडे आणि अभिनव भारतचे नेते समीर कुलकर्णी हे सगळे एकाच मंचावर दिसत आहेत. सध्या ही सगळी मंडळी न्यायालयीन कोठडीत आहेत. ते एकमेकांना ओळखत होते आणि एकमेकांच्या संपर्कातही होते, हे या व्हीडियोतून सिद्ध होतंय. अभिनव भारतने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात संघटनेच्या अध्यक्षा हिमानी सावरकरही दिसत आहेत.

close