सोनिया गांधींच्या पोस्टरवर फेकली शाई

January 16, 2012 12:53 PM0 commentsViews: 2

16 जानेवारी

राजधानी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयासमोरच्या सोनिया गांधींच्या पोस्टरवर एका व्यक्तीनं आज शाई फेकली. शाई फेकणार्‍या व्यक्तीला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. यानंतर त्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही व्यक्ती बाबा रामदेव यांची समर्थक असल्याचं बोललं जातंय.

विशेष म्हणजे दिल्लीत काँग्रेसचे मुख्यालय हे 24 अकबर रोडवर स्थित आहे. दुपारी 4 च्या सुमारास काही लोकांनी बाबा रामदेव यांच्या समर्थनात कार्यालयाबाहेर जोरदान घोषणा देण्यास सुरुवात केली. साधू-संताचा अपमान सहन केला जाणार नाही अशा घोषणा देत असताना गर्दीतून एक व्यक्ती समोर आला आणि सोनिया गांधी यांच्या पोस्टरवर काळी शाई फेकली. हे पाहुन उभे असलेले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकणार्‍या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी घोषणा देणार समर्थकांनी पळ काढला पण एक व्यक्ती तावडीत सापडला. संतप्त झालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला लाथा-बुक्यानी बेदम मारहाण केली आणि पोलिसांकडे स्वाधीन केले. यावेळी काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी ही घटना दुर्देवी आहे बाबांवर जेव्हा शाई फेकली गेली होती तेव्हा काँग्रेसने त्या घटनेचा निषेध व्यक्त केला होता.

close