आयबीएन लोकमतला रामनाथ गोएंका पुरस्कार

January 16, 2012 6:25 PM0 commentsViews: 7

16 जानेवारी

आयबीएन लोकमतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. आमच्या डेप्युटी फिचर एडीटर आरती कुलकर्णी यांना प्रतिष्ठेचा रामनाथ गोएंका पत्रकारिता पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीत झालेल्या एका शानदार समारंभात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'पर्यावरण पत्रकारिता, राष्ट्रीय' या विभागात आरती कुलकर्णी यांची निवड करण्यात आलीय. ताडोबा अभयारण्यात सुरू असलेल्या अवैध खाणकामाबद्दल 'घुसखोरी वाघाच्या जंगलात' हा रिपोर्ताज आरती कुलकणीर्ंनी केला होता. याशिवाय नॉमिनेशन्सच्या यादीत आयबीएन-लोकमतच्या आणखी 4 पत्रकारांचाही समावेश होता. यात पर्यावरणसाठी दिनेश केळुसकर, क्रीडा विभागासाठी विनायक गायकवाड, बिझनेससाठी अमृता दुर्वे आणि करमणूक विभागात माधुरी निकुंभ यांचा समावेश आहे. आयबीएन नेटवर्कला सर्वाधिक पाच पुरस्कार मिळाले आहेत.

close