राष्ट्रवादीत आणखी एका गुंडाचा प्रवेश

January 18, 2012 8:42 AM0 commentsViews: 4

18 जानेवारी

कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रवीकांत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. सोलापूरचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातले नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत पाटील यांच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा करण्यात आली. युवा कार्यकर्त्यांचा मोठा जनाधार असलेल्या पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय. कर्नाटकातल्या विजापूर या भागात रवीकांत पाटील यांचं वर्चस्व मानलं जातं. 1995 ते 2003 या दरम्यान इंडी मतदारसंघातून 3 वेळा अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले होते. सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते-पाटील या दोन दिग्गज नेत्यांना रविकांत पाटील यांनी नेहमीच आव्हान दिलंय. या भागात काँग्रेसला चाप लावण्यासाठी राष्ट्रवादीनं रविकांत पाटील यांना पक्षात प्रवेश दिल्याचं मानलं जातंय. विशेष म्हणजे रवीकांत पाटील यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहित असतानाही राष्ट्रवादीनं त्यांना पक्षात प्रवेश दिला. या प्रवेशाच्यावेळी खुद्द लक्ष्मण ढोबळेसुद्धा हे उपस्थित होते.

close