धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीशी असलेली सलगी उघड

January 18, 2012 9:06 AM0 commentsViews: 1

18 जानेवारी

भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा पुतण्या भाजप आमदार धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांना पुष्टी मिळाली आहेत. धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातल्या कासारवाडी इथे राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला उपस्थित असल्याचं उघड झालं आहे. धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांसोबत या कार्यालयाचं उद्घाटन केल्याचं समजतंय. धनंजय मुंडे अजूनही भाजपातच आहेत.पण त्यांची राष्ट्रवादीशी वाढत असलेली सलगीही आता आणखी उघड झाली आहे. उद्या पंडित अण्णा मुंडे राष्ट्रावादीत प्रवेश करणार आहेत आणि त्याचबरोबर नगरसेवकांचा सत्कार समारंभ पार पडणार आहे. या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमालासुद्धा धनंजय मंुडे हजर राहणार आहेत.

close