शिवाजी पार्कवर सभेला मनसेला परवानगी नाकारली

January 18, 2012 9:13 AM0 commentsViews: 5

18 जानेवारी

1 फेब्रुवारी ते 6 मार्चपर्यंत कोणत्याही एका दिवशी शिवाजी पार्कवर सभेसाठी मनसेने मुंबई महानगर पालिकेकडे परवानगी मागितली होती. पण महापालिकेने मनसेच्या सभेला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मनसेनं आता हायकोर्टात धाव घेतली आहे. शिवाजी पार्क सायलन्स झोन घोषित झाल्यामुळे कोणत्याही सभाना परवानगी नाकारण्यात येत आहे. पण शिवसेनेच्या दसर्‍या मेळाव्याला दोनवेळा परवानगी देण्यात आली होती. याच मुद्यावरून मनसे कोर्टात धाव घेतली आहे. मनसेच्या अर्जावर आता उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे.

close