विकीपीडिया 24 तासांसाठी बंद

January 18, 2012 9:24 AM0 commentsViews: 6

18 जानेवारी

ऑनलाईन एनसायक्लोपीडिया-विकीपीडिया आजपासून 24 तासांसाठी उपलब्ध नसणार आहे. अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या निर्बंधांचा निषेध म्हणून इंग्लिश विकीपीडिया जगभर 24 तासांसाठी ब्लॅकआऊट होईल. विकीपीडियातर्फे करण्यात येणारं अशाप्रकारचं हे पहिलंच निदर्शन आहे. अमेरिकन संसदेत सध्या स्टॉप ऑनलाईन पायरसी ऍक्ट आणि प्रोटेक्ट IP ऍक्ट अशी दोन विधेयकं प्रस्तावित आहेत. ही विधेयकं पास झाली तर एकूणच इंटरनेट आणि विकीपीडियावर बंधन येतील असं विकीपीडियन्सचं म्हणणं आहे.

close