केक खाण्याची स्पर्धा जीवावर बेतली

November 20, 2008 1:40 PM0 commentsViews: 3

20 नोव्हेंबर पैज आणि शर्यतीचा कैफ माणसाला भान विसरायला लावतो. पण हाच कैफ कधी कधी माणसाच्या जीवावर बेतू शकतो. अशीच दुदैर्वी घटना दिल्लीच्या गुडगावमध्ये घडली. केक खाण्याच्या एका स्पर्धेत केक गळ्यात अडकल्यानं एका तरुण इंजिनिअरचा मृत्यू झालाय. सौरभ सबरवाल असं त्याचं नाव आहे. गुडगावच्या उद्योगविहारमधल्या एका कॉल सेंटरमध्ये ही घटना घडली. ऑफिसमध्ये कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त केक खाण्याची स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यात भराभर खाताना सौरभच्या गळ्यात केक अडकला आणि त्याचा गुदमरून मृत्यू झाला. सौरवच्या मृत्यूला स्पर्धा आयोजित करणारी कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय.

close