आयोगाने अजित पवारांना सोडलंच कसं ? – राज

January 18, 2012 11:47 AM0 commentsViews: 3

18 जानेवारी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा तोफ डागली. आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणात दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आयोगाने अजित पवारांना सोडलंच कसं असा सवाल राज यांनी उपस्थित केला. उद्या मीसुद्धा अशी चूक करून दिलगिरी व्यक्त करतो, निवडणूक आयोग मला सोडेल का ? असा सवाल राज यांनी निवडणूक आयोगाला विचाराला.

3 जानेवारीला राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन राज्यात महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आणि दुपारपासूनच आंचारसंहिता लागू केल्या. पण याच दिवशी संध्याकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. याप्रकरणी शिवसेनेचे पालिकेतील गटनेते शाम देशपांडे यांनी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी अखेर अजित पवार यांनी चुक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. अजितदादांच्या दिलगिरी व्यक्त केल्यामुळे आयोगाने क्लिन चीट दिली. राज यांनी निवडणुकाचं आयोगाचं लोणचं घालायचं का, या शब्दात आयोगावर तोफ डागली. अजित पवारांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आयोगाने त्यांना सोडलं कसं ? उद्या मी सुध्दा अशी चूक करतो आणि दिलगिरी व्यक्त करतो आयोग मला सोडले का ? असा संतप्त सवाल राज यांनी उपस्थित केला. काल मंगळवारीच राज्य निवडणूक आयोगाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली काम करु नये, असा गंभीर आरोप राज यांनी केला होता.

close