नाशकात बनावट मतदारांचा सुळसुळाट

January 18, 2012 11:19 AM0 commentsViews: 1

18 जानेवारी

कुठे तब्बल 3 हजार मतदार बनावट…तर कुठे एकाच नगरसेवकाचे कुटुंबीय 6 वेळा…कुठे एका घरातले मतदार दोन वॉर्डांमध्ये…तर कुठे चक्क 15 वर्षांचे मतदार…अशा अनेक हरकतींचा पाऊस नाशिकच्या निवडणूक आयुक्तांकडे पडला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी नगरसेवकांनी महापालिकेच्या कर्मचार्‍यांना हाताशी धरून मतदार यादीत फेरफार केल्याच्या गंभीर तक्रारी पुढे आल्या आहेत. मतदार यादीतील घोळ जास्त आणि त्याची पडताळणी करण्यासाठीचा वेळ कमी अशा कोंडीत आता नाशिककर सापडले आहेत.

close