बंडखोर नगरसेवकांच्या हाती स्वत:च्याच पक्षाचा झेंडा

January 18, 2012 8:27 AM0 commentsViews: 4

18 जानेवारी

पुण्यातील भाजपमधून निलंबित केलेले बंडखोर नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी पुणे जनहित आघाडी हा पक्ष स्थापन करून महापालिका निवडणुकीत रंग भरले आहेत. या पक्षाचा कृतीसंकल्प प्रकाशित करण्यात आला.शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते विनय हर्डीकर हे या आघाडीचे समन्वयक आहेत. जनहित आघाडीतर्फे किमान 20 ते 25 उमेदवार उभे केले जाणार आहेत. विशेष म्हणजे यात सुशिक्षित महिला उमेदवारांचा भरणा असणार आहे.

close