पंडित अण्णा मुंडे राष्ट्रवादीत

January 19, 2012 9:10 AM0 commentsViews: 15

19 जानेवारी

बीडच्या राजकारणात आज मोठा फेरबदल झाला. गोपीनाथ मुंडेंचे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परळीत झालेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांची प्रमुख उपस्थिती होती. पंडित अण्णा हे भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे यांचे मोठे भाऊ असल्याने या प्रवेशाला अत्यंत महत्व प्राप्त झालं आहे.

पंडितअण्णा यांचा मुलगा आणि भाजपचे आमदार धनंजय मुंडे हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंडेच्या राजकीय घराण्याला अजित पवार यांनी सुरुंग लावल्याचा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केल्याने या जिल्ह्यातील राजकारणात मुंडे विरुध्द मुंडे असं स्वरूप या संघर्षाला प्राप्त झालंय. गोपीनाथ मुंडे यांची पत्नी प्रज्ञा ह्याच आमचं घर फोडण्याला कारणीभूत असल्याचे पंडितअण्णा यांचं म्हणणं आहे. घरफोडीचा आरोप अजित पवार यांनी जरी फेटाळला असला तरी या राजकीय नाट्याचे खरे सूत्रधार अजित पवार असल्याचंच आता स्पष्ट झालं आहे.

इतर बातम्या (बातमी पाहण्यासाठी हेडलाईनवर क्लिक करा )

गोपीनाथ मुंडे पळपुटे – पंडित अण्णा मुंडे

बंड नव्हे, हे इमानदार कार्यकर्त्यांसाठी – धनंजय मुंडे

आयुष्यात चढ उतार येत असतात – गोपीनाथ मुंडे

close