नरेंद्र मोदींना झटका ; लोकायुक्तांची नियुक्ती कायम

January 18, 2012 11:57 AM0 commentsViews: 4

18 जानेवारी

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना धक्का बसला आहे. लोकायुक्तासंदर्भात गुजरात सरकारची याचिका हायकोर्टाने फेटाळत राज्यपालांनी केलेली नियुक्ती योग्य असल्याचे सांगितले आहेत. राज्यपाल डॉ. कमला बेनीवाला काही महिन्यांपूर्वी निवृत्त न्यायाधीश आर.ए.मेहता यांची गुजरातच्या लोकायुक्तपदी नियुक्ती केली होती. सरकारला न विचारता केलेली ही नियुक्ती घटनाबाह्य आहे असं सरकारचं म्हणणं होतं. म्हणूनच सरकारने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. पण आज हायकोर्टाने सरकारची याचिका फेटाळत नरेंद्र मोदी यांना धक्का दिला. मेहता यांच्या नियुक्तीपूर्वी 8 वर्ष गुजरातमध्ये लोकायुक्तपद रिकामं होतं.

close